नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करीत असलेल्या सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चाही जोरात सुरू झाल्या आहेत. कारण गेल्या वर्षभरात आर्थिक आघाडीवरचं अपयश हाच सरकारसाठी सर्वात मोठा आव्हानाचा विषय ठरला आहे. यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पदाबाबत सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थमंत्रीपदासाठी प्रख्यात बँकर के व्ही कामत यांच्या नावाची चर्चा काही पहिल्यांदा होत नाही. अगदी यावर्षीचं बजेट सादर होण्याच्या आधीही अशा बातम्या आल्या होत्या. कामत हे ब्रिक्स देशांच्या नॅशनल डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमन म्हणून 27 मे रोजीच निवृत्त झाले. त्यानंतर या बातम्यांनी पुन्हा जोर धरला आहे.
कोरोनाचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत चालली आहे असे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोडमडली असल्याने ती पुन्हा उभारण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कारभारावर विरोधी पक्षाकडूनही सातत्याने टीका केली जात आहे.
असे असले तरीही मोदींच्या निकाटवर्तीय नेत्यांमध्ये सीतारमण यांची जागा असल्याने त्यांना या पदावरून हटविण्याचा मोदी निर्णय घेतील का याबद्दल शंका आहे. कोरोनाच्या संकटकाळात सरकारने नुकतेच 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यासाठी सलग पाच दिवस निर्मला सीतारामन पत्रकार परिषदा घेत होत्या. आर्थिक आघाडीवरचं एक मोठे काम त्यांच्याच नेतृत्वात पार पडले आहे मोदींना सीतारमण यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तूर्तास तरी सीतारमण याच मंत्रीपदी कायम राहतील अशी जाणकार लोकांची मते आहेत.
भाजपचा ‘हा’ दिग्गज नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात ?
केंद्राच्या पॅकेजने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, यावर कर्जमुक्तीचं हवी
कोरोनाच्या संकटकाळात नगरपरिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळे भाडे माफ करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
