सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाधित असलेल्या क्षेत्रात सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून त्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.सोलापूर शहरातील एकूण 85 ठिकाणी कंनटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
5 पेक्षा जास्त रूग्ण असलेले 13 ठिकाणी अति बाधित परीसर म्हणून घोषित करण्यात आले आहे.आज शास्त्रीनगर येथील भगतसिंग चौक येते सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असून उर्वरित भागा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत.ज्या भागात जादा रुग्ण आढळून आले आहेत त्या भागातील नागरिकांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
महाराष्ट्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भूमिपुत्रांनो पुढे या – उद्धव ठाकरे
शास्त्रीनगरनंतर, इंदिरा गांधीनगर आणि त्यानंतर उर्वरीत कंटेनमेंट झोनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.कंटेंनमेंट झोन वाढू लागल्याने महापालिका प्रशासानाच्या यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अशावेळी सीसी टीव्हीच्या माध्यमातून संबंधित परिसरावर सीसी टीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
शहरात अति बाधित क्षेत्र म्हणून जाहिर केलेल्या भाग शास्त्री नगर,शानदार चौक, पाच्छ पेठ,इंदिरा गांधी नगर,लष्कर(सदरबाजर) ,मोदी खाना,गवळी वस्ती,(कुंभारी रोड)सिद्धेश्वर पेठ,अशोक चौक आदी भागात बसविण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
…अखेर राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या दाखल ; अनिल देशमुख यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

