Share

…अखेर राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या दाखल ; अनिल देशमुख यांची माहिती

Published On: 

मुंबई : केंद्रीय पोलीस दलाच्या २० पैकी ९ तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत. या तुकड्या मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,अनिल देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पोलीस अविरत काम करत आहेत. त्यामुळं त्यांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही केंद्राला विनंती केली होती की, केंद्रीय पोलीस दलाच्या 20 तुकड्या महाराष्ट्रात पाठवाव्यात. त्यापैकी आतापर्यंत 9 तुकड्या महाराष्ट्रात आल्या आहेत. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावतीत आम्ही या तुकड्या तैनात केल्या आहेत. रमझान, आषाढी वारी, गणेशोत्सव आहे. अशावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल मदतीला येईल.’

गेले दोन महिने लागू असलेल्या ताळेबंदीच्या काळात राज्यातले सव्वा दोन लाख पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अखंड कर्तव्य बजावत आहेत. तसंच आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता या पोलिसांवरच ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्रीय पोलीस दलाच्या २० तुकड्यांची मागणी केली होती.

दरम्यान,अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परप्रांतीय मजुरांची संख्या अधिक असून २२४ रेल्वे गाड्या आणि साडे अकरा हजार एस टी गाड्यांमधून या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवलं आहे. आतापर्यंत २ लाख ९२ हजार मजूर आणि त्यांच्या कुटुंबांची मोफत रवानगी करण्यात आली असून यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री निधीतून ५५ कोटी रुपये दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र बिहार आणि पश्चिम बंगाल सरकारकडून त्यांच्या राज्यातल्या मजुरांना परत पाठवण्यासाठी जलद प्रतिसाद मिळत नसल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ निखळले ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली

दरम्यान, भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही वाढून ३ हजार २९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे करोनाग्रस्तांची जगभरातील संख्यादेखील ४७ लाखांवर पोहोचली आहे. तर मृतांच्या संख्येनंही ३ लाख १५ हजारांचा आकडा पार केला आहे.

सध्या देशात 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथील रूग्णांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 1198 वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 379 पर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 659 आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

राज्यात रविवारी (17 मे) विक्रमी 2347 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. काल 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 33 हजार 53 झाला आहे. त्यापैकी 24 हजार 161 रुग्ण अॅक्टिव असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान,रविवारी लॉकडाउचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. तर दुसरीकडे आजपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली. ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू राहणार आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं काही सुटही दिली आहे. आगामी काळातील ईद ,वारी आणि गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त हा महत्वाचा मानला जात आहे.

कोरोना संकटातील मदतीचे संगमनेर मॉडेल दिशादर्शक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!