🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लादलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात येत आहे. याआधी सलग दोन वेळा लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली आहे . लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून अखेर राज्य सरकारकडून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम करण्याची घोषणा केली आहे.
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.
राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी पत्राद्वारे सर्व विभागांना कळवलं आहे. ‘राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन ३१ मेच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असेल,’ असं अजॉय मेहता यांनी पत्रात म्हटलं आहे.
Government of Maharashtra extends lockdown till May 31 for containment of COVID19. pic.twitter.com/qjJOfEj6o0
— ANI (@ANI) May 17, 2020
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज रात्री संपणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

