🕒 1 min read
नवी दिल्ली : रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्यांमधून आतापर्यंत १२ लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांच्या राज्यात पोचवलं आहे. त्यात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक इत्यादिंचा समावेश असून त्यांना पोचवण्यासाठी शंभराहून अधिक गाड्या चालवल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं.
आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार,दररोज ४ लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांच्या राज्यात पोचवण्यासाठी रोज ३०० हून अधिक गाड्या चालवण्याची आपली तयारी असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. दरम्यान,सध्या देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्यांसह राजधानी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. जर शताब्दी विशेष आणि इंटरसिटी विशेष गाड्या चालवल्या गेल्या तर मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल अशी शक्यता आहे.
बीड : पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा – प्रकाश आंबेडकर
दरम्यान, भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीकपद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केलं.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी सध्या रेल्वेकडून विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत, त्या मजुरांसाठी चालवण्यात येत असलेल्या विशेष गाड्या सुरूच राहतील. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.
साखर कारखानदारी समोरील अडचणींत वाढ, शासनाच्या मदतीची गरज- घाटगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
