Share

‘जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थान ट्रस्टचे सोने ताब्यात घेण्याचा पर्याय योग्य’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पात करावयाच्या घोषणा नव्हेत, अशोक चव्हाणांचा केंद्रावर निशाणा

या मुद्द्यावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी उघडपणे पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्तःन केले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे.सर्वधर्मीय देवस्थान मधील सोने 1 ते 2 टक्के व्याजाने सरकारने घ्यावे.कारण सध्या देश संकटात आहे अशा वेळेला दारू विकून किंवा जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा हा पर्याय कधीही योग्यच राहील.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या,पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अभ्यासू मागणीनंतर काही लोकांनी त्यांच्यावर धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने टीका केली आहे. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचे डोके ठिकाणावर आहे तुमचे डोके ठिकाणावर ठेवून टीका करा, देवस्थान ही कोणाच्याच बापाची खाजगी मिळत नाही ओ. यात देवाला अर्पण केलेले पैसे, सोने जे काही असते ते भक्तांनी मनोभावे अर्पण केलेले असते आणि त्याचा उपयोग जर देश संकटात असेल तेव्हा झाला तर नक्कीच देवालाही आनंद होईल.

मोदी सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार : बाळासाहेब थोरात

तर दुसऱ्या बाजूला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला आहे.याबाबत भातखळकरांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, 2G, 3G तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी तिजोरीचे दार थोडे किलकिले केले तरी कशाचीच गरज पडणार नाही अशा शब्दात त्यांनी चव्हाणांच्या सूचनेची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, देशात इतर धर्मीयांची देखील प्रार्थनास्थळे आहेत.ती देखील हिंदू मंदिरांच्या बरोबरीने श्रीमंत आहेत त्याबद्दल चव्हाण किंवा इतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगल्याने या प्रकरणाला वेगळा रंग चढताना दिसत आहे. याशिवाय राज्य सरकार याबाबत काही भूमिका घेणार आहे का हे देखील अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका, पालकमंत्र्यांनीचं केली विनंती !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!