कोल्हापूर : मुंबई-पुण्यात अडकलेले नागरिक आता आपल्या घरी गावी परतत आहेत. मात्र हे नागरिक गावी परतत असताना कोरोनाला बरोबर तर घेऊन येत नाही ना ? याची तपासणी स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे. यामुळेचं कोल्हापूरमध्ये देखील पुणे – मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली. या तपासणी अंती 12जण कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका, अशी विंनती केली आहे.
ते म्हणाले की, मुंबई-पुण्याहून ८६ हजार लोकं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यातले १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोल्हापूरकरांना याची काळजी घ्यावी लागणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले. रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घ्यायचा निर्णय आम्ही घेतला, या निर्णयाचा फायदा आम्हाला होत आहे.
रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हायवेवरूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि त्यांना २४ तास क्वारंटाईन ठेवलं जात आहे. या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच आम्ही त्यांना सोडत आहोत. याच पद्धतीमुळे आम्हाला १० ते १२ रुग्ण सापडल्याची माहिती पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपने सावध राहावे अन्यथा नव्या भूकंपाची वात पेटेलं, शिवसेनेचा सल्ला
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

