Share

आशिष नेहरा निवृत्तीनंतर करणार हे नवीन काम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –  सेवानिवृत्त नंतर अनेकजण अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करतात. काही लोक समाजसेवा करतात तर काही स्वतासाठी वेळ काढतात . क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने देखील निवृत्तीनंतर स्वताला सामाजिक कामा करता झोकून दिले. याबरोबरच राजकारणातून समाजसेवा सुरु करण्यास सुरुवात केली आता लवकरच  सुमारे 20 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळणारा 38 वर्षीय आशिष नेहरा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत. 1999 पासून टेस्ट आणि 2001 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय टीममध्ये नेहराने पदार्पण केले.

आपल्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये नेहराने 17 कसोटीत 44 बळी घेतले. 120 एकदिवसीय सामन्यांत 157 बळी आणि 26 टी -20 मध्ये 34 विकेट्स घेतले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, वेगवान गोलंदाज नेहरा आपला वेग, अचूकता आणि लाईन लेंथमध्ये बदल यातून फलंदाजांच्या विकेट घेत असे. पण दुखापतीने त्याला संपूर्ण करिअरमध्ये त्रास दिला.

निवृत्तीनंतरही आशिष नेहरा क्रिकेटसोबत जोडलेला राहणार आहे. तो मागास भागांतील मुलांना क्रिकेट शिकवणार आहे. जहीर खानसोबत नेहराने बुंदेलखंडमध्ये याची सुरुवात देखील केली आहे. सेवानिवृत्तीनंतर नेहरा क्रिकेट अकॅडमीवर लक्ष केंद्रित करणार आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!