Share

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी आघाडीच्या नेत्याचे प्लॅनिंग, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीचं जुंपली आहे. त्यातचं आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी आघाडीच्या नेत्याचे प्लॅनिंग   आहे, असा  आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे, त्यात आम्ही का पुढाकार घ्यावा? आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंञिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला आहे.

तसेच शिवसेना नेते  संजय राऊत यांनी राजभवनाबाबत केलेल्या ट्विटवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.  आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत, पण राज्यपालांना दमबाजी करणं कितपत योग्य आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमुळे विधान परिषदेची निवडणूक पुढ ढकल्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाकडून उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. परंतु,राज्यपालांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावाला परवानगी न दिल्यामुळे वाद पेटला आहे.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!