Share

परीस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर मूंबईत लष्कराला पाचारण करणे हाच पर्याय : नितेश राणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष भाजप  जोरदार टीका करत आहे तसेच सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे असेही ते म्हणत आहे.

आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून लष्कराला बोलावणं हा एकमेक पर्याय असल्याचं म्हटलं आहे. महापालिकेत खूप गोंधळ उडाला असून जर काहीच बदललं नाही तर गोष्टी हाताबाहेर निघून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई महापालिकेत खूप गोंधळ आहे. जर काही बदल झाले नाही तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल. खरी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. जी आकडेवारी दाखवली जात आहे त्यापेक्षा ही संख्या खूप मोठी आहे”.

नितेश राणे यांनी लवकरच नवे महापालिका आयुक्त निवडले जाणार का ? असा प्रश्नही विचारला आहे. पुढे ते म्हणाले आहेत की,“आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय आहे

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!