सोलापूर : इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय महिलेचा कोरोना बाधिताने अाज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दुपारी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधिताने मृत्यू होणारा हा दुसरा रुग्ण आहे. यापूर्वी मागील आठवड्यात १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिला रुग्ण कोरोना झाल्याने मृत्यू पावला होता.
सदर मृत महिलेच्या संपर्काततील एकूण ८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महिलेचा मृत्यू होताच जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने सत्तरफूट रोड वरील इंदिरानगर परिसरातील ५०० मीटर परिसर सील करण्यात आला.
आतापर्यंत आयसोलेशनमधील ७१८ संख्या असून त्यापैकी ५०५ अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील ५९० रुग्ण निगेटिव्ह आढळून आले असून १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील १३ रुग्णांवर उपचार सुरू असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इंदिरानगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने येथील परिसरात सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. ज्या व्यक्तींना सर्दी , खोकला, ताप असेल त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

