मालेगाव : नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. मात्र मालेगावातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दोन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसबजावण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असून देखील सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याचे कारणच काय आहे ? आणि गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासन काय करत आहेत ? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. मालेगावात देखील अनेक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तरीदेखील नागरिकांमध्ये जागरूकता येत नसल्याच समोर आले आहे. तर पोलीस देखील आपले कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा करत असल्याने वरिष्ठांनी दोन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस, आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकार हे सेवेसाठी कोरोनाच्या संकटातही कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि काही पोलिसांना देखील आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठीच प्रशासन वारंवार नागरिकांना घरी सुरक्षित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
