Share

जडेजाच्या तलवारबाजीने सोशल मीडियावर केला धुराळा, पाहाल तर व्हाल थक्क !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची मैदानावरची तलवारबाजी ही अनेकवेळा आपण पहिली आहे. मात्र जडेजाने आता खर तलवारबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच शेअर होत आहे.

रविवारी जडेजाने आपला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. यामध्ये जडेजा खऱ्या तलवारीने आपले कौशल्य दाखवत आहे. मात्र जडेजाचा या  व्हिडीओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. जडेजाचा हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना आवडला आहे, त्यामुळे अकरा हजार लोकांनी रिट्वीट केला आहे.

दरम्यान मैदानात अर्धशतक झाल्यानंतर रवींद्र जडेजा हा बॅॅट तलवारीसारखी फिरवत मजा घेत असतो.  त्याची ही शैली सोशल मीडियावर  चांगलीचं प्रसिद्ध झाली आहे. तर आता जडेजाचा  खऱ्या तलवारी बरोबरचा व्हिडीओ हा देखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जडेजादेखील घरी सुरक्षित आहे. तर त्यामुळे मोकळा वेळ असल्याने तो आपले छंद जोपासत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!