Share

अजित पवारांनी व्यक्त केला ‘विश्वास’; महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘राज्यावरील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करावे. जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत व कुणीही घराबाहेर पडू नये, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

याचप्रमाणे हुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. असं वृत्त etvbhart ने प्रसिद्ध केलं आहे.

‘महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाची संधीही उपलब्ध केली. महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. अनेक क्षेत्रात, महिला आत्मविश्वासाने जबाबदारी सांभाळताना दिसतात. त्याचे श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आहे. या दोघांनी समाजकार्याचा डोंगर उभा केला,’ असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचे सामाजिक कार्य अलौकिक आहे. त्यांचे कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आपण जयंतीच्या निमित्ताने करूया, अशा शब्दात या दोघांच्या कार्याचं स्मरण करुन अजित पवार यांनी अभिवादन केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!