पुणे, ता. ३१ : महापालिकेतील भाजपचे ९७ नगरसेवक कोरोना संकटासाठी वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कोरोना संकटाशी लढताना विविध उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकाद्वारे दिली. या विषयाचे पत्र सभागृह नेते धीरज घाटे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले.
मुळीक म्हणाले, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शहर भाजपने हा निर्णय घेतला. या निधीचा विनियोग व्हेंटिलेटर, मॉनिटरर्स, ईसीजी मशिन्स, डीफिबि‘लेटर, सक्शन मशिन्स, एक्स रे मशिन्स, फॉगर आदी वैद्यकीय उपकरणे आणि स्थानिक स्तरावरील उपाययोजनांसाठी करावा अशा सुचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
दरम्यान देशात आणि महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या रोज वाढत असून आरोग्य सेवा आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होत आहे. प्रशासनाने नागरिकांनी बाहेर पडू नये आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यात मदत करावी अशी विनंती केला आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
