मुंबई : ‘कोरोनाचे महाभयंकर संकट उभे टाकले असताना त्यासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून वेळीच तयारी सुरू केली. परंतु, केंद्र सरकारने त्यासाठी दिरंगाई केली,’ असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने लॉकडाऊनसाठी दिरंगाई केली असल्याचा आरोप करताना थोरात म्हणाले, केंद्राने दिरंगाई केली तरी आम्ही मात्र राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
तसेच जनतेला मदत करण्यासंदर्भात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, की कोरोना विषाणूचे संकट जगभर गंभीर झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जगभर थैमान घालणाऱ्या या आजाराबाबत आपले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार फार लवकर सतर्क झाले होते. आपण फेब्रुवारी महिन्यापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली होती.
दरम्यान, ‘कोरोनाच्या संकटात आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आपले नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्यासाठी धोरणात्मक कार्यक्रमाची आखणी पक्षाने केली असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
