Share

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोस्ट ऑफीस व बँकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी उदय चौधरी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सर्व बँका तसेच पोस्ट ऑफीस मध्ये गर्दी व विविध लोकांनी हाताळलेले पासबुक व चलनी नोटा यांमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस व बँकानी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पोस्ट ऑफीस व बँकांच्या ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या शाखेमध्ये यावे. सर्दी, ताप, खोकला इ. चा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. मुख्य प्रवेशद्वारावर गार्ड नेमण्यात यावा. शाखेमध्ये एका वेळेस फक्त 4 ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. पोस्ट व बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांची एका काऊंटरवर एका वेळी एकच ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी, उर्वरीत ग्राहांकाना पोस्ट ऑफिस / बँकेच्या बाहेर दोन ते तीन फुटाचे अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून 3 ते 5 फुटाचे अंतर ठेवावे.

सर्व बँका सकाळी 10.00 ते 2.00 पर्यंत रोखीचे व्यवहार करु शकतात. बँक फक्त रोख पैसे देणे व पैसे जमा करुन घेणे व पैसे पाठविणे व मागविणे हे काम करु शकतात. कर्ज विषयक कामे बंद राहतील. सर्व ग्राहकांनी दिनांक 31.03.2020 पर्यंतआर्थिक व्यवहाराशी संबंधीत नसलेल्या बाबींसाठी जसे की, शिल्लम रक्कम चौकशी, केवायसी अद्यावतीकरण, आधार कार्ड व पॅन कार्ड संलग्नीकरण, बँक खाते अद्यावतीकरण, बँक स्टेटमेंट, पासबुक प्रिंटींग इत्यादी व इतर यासाठी बँकेत येऊ नये. पोस्ट ऑफिस व बँकेच्या एटीएममध्ये एकावेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरीत ग्राहकांना दोन ते तीन फुट अंतरावर थांबण्यास सांगावे. एटीएम मशीनचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सर्व बँकांनी आपआपल्या शाखेतील एटीएम, कॅश /चेक डिपॉजिट मशिन, पासबुक प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

बँकेमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या नागरीकांना हात धुण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. बँक इमारत व परीसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. सर्व ग्राहकांनी बँकेच्या इतर वितरण पर्यायांचा उदा.इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआय, एटीएम, कॅश डिपॉजिट मशिन इ. सुविधांचा जास्तीत जास्त वापर करणेबाबत बँकांनी नागरीकांना प्रेरीत करावे. सर्व शाखा आपल्या कर्मचाऱ्यांच्या किमान उपस्थितीसंबंधी योजना करुन ग्राहकांना सेवा प्रदान करतील.एक अधिकारी असलेल्या शाखांच्या कामकाजांच्या संदर्भात, बँक सूचित करतील अशा शाखा आवश्यकता असल्यास एक दिवसआड काम करतील.

सदर आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सदरील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!