🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – गरिबांनी चांगले शिक्षण घेऊच नये का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.२०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले आंतरराष्ट्रीय शाळांचे बोर्ड आम्ही तयार केले. त्यात ८१ पैकी ६० शाळा या जिल्हा परिषदेच्या. १ नगरपालिकेची शाळा आणि १२ अनुदानित शाळा निवडण्यात आल्या. आपल्या विद्यार्थ्यांना जगात स्पर्धा करता यावी, हा त्याचा उद्देश होता. पण, या सरकारने तेही बंद करण्याचा निर्णय घेतला.
मातृभाषेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याचा आणि त्यातून आंतरराष्ट्रीय जाणीव जागृत करण्याचा उद्देश त्यात होता. डॉ. विजय भटकर, डॉ. काकोडकर, डॉ. स्वरूप संपत यांच्यासारख्या तज्ञांचा या मंडळात समावेश होता. वर्षभराच्या मंथनानंतर हे बोर्ड तयार झाले होते. गरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? कुणाच्या दबावात असले निर्णय घेतले जातात. पालकांनी निदर्शने केली, पण सरकारने ऐकले नाही. असाही फडणवीस यावेळी म्हणाले.
तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा इतका विटाळ या सरकारला का. मुंबई महापालिकेत आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येतात आणि इकडे ग्रामीण भागातील मुलांवर अन्याय करण्यात येतोय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
चीनमधून येणाऱ्या फुलांवर कारवाई करा!
चीनमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची फुलं भारतात येत आहेत आणि त्यामुळे आपल्या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकर्यांचे उत्पन्न त्यामुळे धोक्यात आले आहे. शिवाय पर्यावरणावर सुद्धा त्याचा प्रतिकूल परिणाम होतो आहे. अशा प्रकाराची फुलं भारतात आणणार्यांवर कारवाई करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
