Share

तब्बल 2600 रुपयांनी सोन्याचे दर कोसळले; जाणून घ्या आजचे दर

Published On: 

मुंबई : कोराना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. याचप्रमाणे देशातील शेअर बाजारातही आज शुक्रवारी हाहाकार उडाला. शेअर बाजार कोसळला असताना सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली. सोन्याच्या भावात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे.

गुरुवारी (काल) प्रतितोळा ४४ हजार २०० असा सोन्याचा दर होता, तर शुक्रवारी म्हणजेच (आज) प्रतितोळा ४१ हजार ६०० असा दर आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर प्रतितोळा २६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गुरुवारी सोने 128 रुपयांनी स्वस्त होऊन त्याचा भाव 44 हजार 490 रुपयांवर आला होता. तसेच चांदी 302 रुपयांनी स्वस्त होऊन भाव किलोला 46 हजार 868 रुपये झाला होता.

दरम्यान, आज, शुक्रवारी देशातील शेअर बाजारातही निर्देशांक तब्बल ३१०० अंकांनी तर तर निफ्टी तब्बल ९५० अंकांनी कोसळला. सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!