Share

‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’:शेलार 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केल्यानंतर मुंबई भाजप चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली आहे. ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे .

भांडुप पोट निवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दाखवला होता. जवळपास निम्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी चुरस शिवसेना विरूद्ध भाजप उमेदवारांमध्येच होती.

भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांना ११,१२९ मतं पडली तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना ६,३३७ मतं पडली. भाजपच्या जागृती पाटील या तब्बल ४७९२ मतांनी विजयी झाल्यात.या विजयानंतर ट्विट करत ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दातआशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली .तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?’असा रोकठोक सवाल देखील शेलार यांनी शिवसेनेला विचारला आहे .

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!