🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने आज (शनिवार) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वसिमने प्रथम श्रेणीमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.
Batsman Wasim Jaffar announces retirement from all forms of cricket, says 'My father wanted one of his sons to represent India and I feel proud to have fulfilled his dream.' pic.twitter.com/8vQ7qe9qkw
— ANI (@ANI) March 7, 2020
जाफरने ३१ कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर ३४.१० च्या सरासरीने १९४४ धावा जमा आहेत. दोन वन डे सामन्यांतही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत त्याच्या नावावर सर्वाधिक १९४१० धावा केल्या आहेत आणि यापैकी १२०३८ धावा या रणजी करंडक स्पर्धेतील आहेत.
तंत्रशुद्ध सलामीवीर अशी वसिमची ओळख होती. मुंबईकडून रणजी करंडक खेळताना वसिमने धावांची टांकसाळ उघडली होती. त्यानंतर भारतीय संघातही त्याची निवड करण्यात आली होती. भारताकडून वसिमने ३१ कसोटी सामन्यांमध्ये १९४४ धावा केल्या होत्या. यामध्ये पाच शतकांसह ११ अर्धशतकांचा समावेश होता.
वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ साली वसिमने २१२ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती. जाफरने २ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. यात त्याने एका डावात १० तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
