Share

पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढेंची 2500 फेरीवाल्यांवर कारवाई

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी नागपूर महापालिकेच्याआयुक्तपदाची सुत्रे हाती घेत पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. तीन दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांनी नागपूर शहरातील रस्ते मोकळे केले आहेत.

पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी पहिल्याच दिवशी नागपूर मनपाच्या लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली. दुसऱ्या दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणं दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर मुंढेंनी ‘फेरीवाला हटाव’ मोहिम राबवत तीन दिवसांत शहरातील 2500 फेरीवाल्यांवर कारवाई केली.

दरम्यान, नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये भाजीविक्रेते फेरीवाल्यांना मनपाने जागा दिली आहे. पण ती जागा सोडून रस्त्यावरच अतिक्रमण करत फेरीवाले रस्त्यावर भाजी विकायचे. अशाच 2500 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे रस्त्यावर सुरु असलेली भाजीविक्री अचानक बंद झाल्यानं फेरीवाले संताप व्यक्त केला आहे.

नागपूर शहरात यापूर्वी महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई केली होती. या कारवाईमुळे त्यांना धमकीही आली होती. तरीही शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबली नाही. आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध फेरीवाल्यांवर कारवाईची मोहिम सुरु केली. या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!