Share

केंद्राच्या बजेटकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिक दौऱ्यादरम्यान केली. मराठवाड्याचा दौरा आटोपल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत.

तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल. संसदेत काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, ‘ दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत निवेदन आलं आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला जाईल आणि मुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेतील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, आज होणाऱ्या बजेटकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, देश अनेक नियमांनी ग्रासलाय. बाजारात मंदी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे बजेट केंद्राने द्यावे अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!