🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: संजय राऊतांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना इंदिरा गांधी या करीम लाला,हाजी मस्तान यांना भेटायच्या अशा आशयाचे विधान केले होते.या विधानावर कॉंग्रेसनेते आणि इंदिरा गांधी यांच्या अनुयायांनी तीव्र आक्षेप घेत संजय राउतांना ते विधान मागे घ्यायला भाग पाडले होते.
त्याच मुद्द्याला धरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांना चांगलेच फैलावर घेतले आहे.शेलारांनी ट्वीट करून असे म्हटले आहे की ”सत्तेच्या लाचारीमुळे संजय राऊतांनी स्वर्गीय इंदिराजींची माफी मागितली आणि आपापले मुक्ताफळं वापस घेतली – पण शिवरायांच्या वशांकडे नात्याचे पुरावे मागितल्या बद्दल संजय राऊत माफी मागणार का? अरे विसरलोच आम्ही, ते आता शिवरायांना नाही पण इटालियांना पूजतात ! जय शिवाजी नाही आता जय इटाली !
शेलारांनी आपल्या ट्वीट वरून संजय राऊतांसोबत कॉंग्रेसवर ही टीका केली आहे.
सत्तेच्या लाचारीमुळे संजय राऊतांनी स्वर्गीय इंदिराजींची माफी मागितली आणि आपापले मुक्ताफळं वापस घेतली – पण शिवरायांच्या वशांकडे नात्याचे पुरावे मागितल्या बद्दल संजय राऊत माफी मागणार का? अरे विसरलोच आम्ही, ते आता शिवरायांना नाही पण इटालियांना पूजतात ! जय शिवाजी नाही आता जय इटाली !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
