Share

‘मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं, तेच आज सहकारी साखर कारखाना चालवतात’

Published On: 

औरंगाबाद – मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं असेल, तेच आता सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखाना चालवतात. असं मत भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. औरंगाबादमधील औद्योगिक प्रदर्शन सोहळ्यात होत असलेल्या उद्योजक मेळाव्याला संबोधित करताना गडकरींनी हा चिमटा काढला.

गडकरी म्हणाले, भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या समाजात तीन विचारधारा होत्या. त्यात समाजवादी, कम्युनिझम, आणि भांडवलशाही यांचा समावेश होतो. समाजवादी विचारधारा त्यावेळी प्रतिष्ठित समजली जायची.त्यानंतर कम्युनिझम विचारधारा होती. मात्र, आता चीनने सुध्दा ही विचारधारा सोडली आहे.

तिसरी विचारधारा म्हणजे भांडवलशाही विचारधारा. त्याचाही एक पक्ष आपल्याकडे स्थापन झाला होता. पण या तीनही विचारधारा आपल्याकडे चालू शकल्या नाहीत.
पुढे रोजगार निर्मिती विषयी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात गरिबी कमी करायची असेल तर रोजगार उपलब्ध केले पाहिजेत. टेक्नोलॉजीचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे. यातून मानवी जीवन अधिक सुखकर होईल.

उद्यमशीलता विकसित झाली, तरच काही करता येऊ शकतं आस गडकरींनी म्हंटल आहे. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, देशात सात लाख कोटी रुपयांचं इंधन आयात केलं जातं.

आपल्याकडचा शेतकरी जट्रोफाच्या रुपाने पर्यायी इंधन निर्मिती करत आहे. तेसच  जट्रोफाच्या पेट्रोलवर आपल्या देशात जेट विमानाचे डेमो उड्डाण यशस्वी झाले असल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!