Share

BCCIची मोठी घोषणा; जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  रविवारी २०१८-१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली.

 

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराहने जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज आहे.

बुमराहने एक ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या. तर १७ वनडेत ३१ विकेट आणि ७ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

२०१८-१९ मध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल दिलीप सरदेसाई पुरस्कारानेदेखील बुमराहचा सत्कार करण्यात येणार आहे. तर, महिलांमध्ये अर्जुन पुरस्कार विजेती पूनम यादवला सर्वोत्तम महिला क्रिकेटरचा सन्मान मिळाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!