Share

पालकमंत्रीपदासाठी कॅंबीनेट मंत्री असलेल्या संदीपान भुमरेंना डावलले

Published On: 

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात पाचव्यांदा निवडुन आलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर रोजगार हमीयोजनेचे खातेही त्यांना मिळाले. कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्यावर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संदीपान भूमरे यांच्याकडे जाईल. असे वाटले होते. मात्र पालकमंत्रीपदाच्या यादीतून भूमरे यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या एवेजी राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. यामूळे शिवसेना पक्षातही सत्तारांनी आपला चांगलाच जम बसविला आहे.

औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे किंवा अब्दुल सत्तार यांना संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र ठाकरे सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना इतर ठिकाणचे पालकमंत्रीपद दिले. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडुणका व भाजपचे वाढत चालेल वर्चस्व कमी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र सयंमी असलेल्या सुभाष देसाईकडे ही जाबाबदारी सोपविण्यात आली आहे. युती सरकारच्या काळात औरंगाबादचे पालकमंत्रीपद हे सेनेकडे राहिले. महाविकास आघाडी सरकारमध्येही शिवसेनेने पालकमंत्री आपल्याकडे ठेवले.

यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्र्याची जाबाबदारी होती.त्यांच्या पुर्वी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबादची पालकमंत्री म्हणून काम पाहीले. आणि आपल्या कामाची छाप सोडली होती. दरम्यान संदीपान भुमरे यांना औरंगाबादचे पालकमंत्रीपद मिळाले नाही. तर इतर जिल्ह्यातील पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यावर पुर्णपणे पाणी फेरले गेले. नाव न आल्यामूळे भुमरे संमर्थकांमध्ये नाराजाची सूर दिसून आला. आता भुमरे पालकमंत्रीपदा विषयी काय भुमिका घेणार याकडेच लक्ष लागून आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!