Share

मंत्रिमंडळ विस्तारच्या मुद्द्यावर अजित पवारांचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारा महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा तीन पक्षांच्या मंत्रिमंडल विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे अशी माहित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिली.पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्विकारायला तयार आहोत असेही अजित पवार पुढे म्हणाले. पक्ष आणि पक्षाच्या विचारसरणीवर आपला पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हर्षवर्धन पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी पत्रकारांनी विचारले असता.हर्षवर्धन पाटील यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.सोबतच मी अजून राष्ट्रवादीतच आहे. या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वक्तव्यावर बोलायला त्यांनी नकार दिला. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी सध्या चर्चा आहे.महाविकास आघाडी सरकारचा हा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्यामुळे सुरु असलेल्या चर्चा लवकरच शमतील अशी आशा आहे.

येत्या मंत्रिमंडळ विस्तारातील काही संभावीत नाव 

शिवसेनेची संभाव्य यादी : अनिल परब ,सुनील प्रभू ,दीपक केसरकर ,उदय सामंत ,तानाजी सावंत ,गुलाबराव पाटील,आशिष जैस्वाल,संजय राठोड ,सुहास कांदे

काँग्रेसची संभाव्य यादी : अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण ,विजय वडेट्टीवार,वर्षा गायकवाड ,यशोमती ठाकूर ,सुनील केदार ,सतेज पाटील ,के. सी. पाडवी ,विश्वजीत कदम

राष्ट्रवादीची संभाव्य यादी : अजित पवार, दिलीप वळसे पाटील ,धनंजय मुंडे ,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ,नवाब मलिक ,राजेश टोपे ,अनिल देशमुख

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!