Share

मितालीचा क्रिकेट प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर

Published On: 

🕒 1 min read

खेळाडू आणि त्यांच्या आयुष्यावर चित्रपट हे ठरलेल समीकरण आहे. याआधी देखील अनेक खेळाडूवर चित्रपट बनविण्यात आले. मेरी कोम, एम एस धोनी, भाग मिल्का भाग,सचिन ,दंगल यासारखे अनेक चित्रपट बनविण्यात आले प्रेक्षकानी देखील त्या चित्रपटाना चांगला प्रतिसाद दिला.

धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे.भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या शिलेदाराचं आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मिताली राजवर बॉलिवूडपट काढण्याची घोषणा व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे. मितालीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मिताली राज ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रीडापटू ठरली आहे. वनडेमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे. वनडेमध्ये सलग सातवेळा अर्धशतक करणारी पहिलीच क्रिकेटपटू आहे.2005 आणि 2017 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय आहे. मितालीला 2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.कहानी, क्वीनपासून मेरी कोमपर्यंत महिला व्यक्तिरेखांना अधोरेखित करणाऱ्या अनेक चित्रपटांची निर्मिती व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे.

‘माझ्या आयुष्यावर चित्रपट निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल’
मिताली राज

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!