Share

‘डाॅ. श्रीराम लागू हे चालते बोलते विद्यापीठ होते’

Published On: 

🕒 1 min read

टीम महारष्ट्र देशा : गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री पुणे येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. डॉ. लागू यांच्या जाण्यान कलाकारांसह अनेक अनेक रसिक प्रेक्षकांना धक्का बसला आहे. तर अनेक कलावंतांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोबतच अनेक राजकीय नेत्यांनी पण ट्विटवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे, यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डॉ. श्रीराम लागू भारतीय रंगभूमीवरील थोर प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या उत्कट अभिनयामुळे त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. चित्रपट व रंगभूमीवरील कलाकारांकरिता डाॅ. श्रीराम लागू चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपट तसेच नाट्यसृष्टीने एक गुरुतुल्य व्यक्तित्व गमावले आहे, या शब्दात राज्यपालांनी डॉ. लागू यांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

या सोबतच, मोदींनी ट्विटवरुन लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, “वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचे काम कायम लक्षात राहील. त्यांचे निधन झाल्याचे समजल्याने अतिशय दुख: झालं आहे. माझी सहानुभूती त्यांच्या चाहत्यांसोबत आहे. ओम शांती,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही श्रीराम लागू यांच्या निधनानंतर ट्विट केले आहे. “माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ. लागू यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’.आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207260587253583874?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207259108723707904?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!