Share

कचरा सोशल मीडियावर चमकल्याने आमदार अमित देशमुखांना जाग

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सोशल मीडियावर कधी कोण चमकेल सांगता येत नाही. प्रकाशनगर भागातील कचऱ्याचे छायाचित्र या भागातील नागरिकांनी सोशल मीडियावर टाकले. बघता बघता त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. शेवटी आमदार अमित देशमुख यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तातडीने या भागातील नगरसेवक आणि पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला.

त्यानंतर या भागात स्वच्छता मोहीम राबवली गेली. प्रकाशनगर भागात आणि नरहरे शाळेच्या मागे अस्वच्छता व कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. कचरा उचलला जात नाही. त्यात तो जाळला जात असल्याने प्रदूषणही वाढले आहे. यातून येथील नागरिकांना रोगराईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या या भागातील काही नागरिकांनी छायाचित्रांसह सोशल मीडियावर मांडली. नागरिकांनी मांडलेल्या अडचणीची दखल देशमुख यांनी घेतली.

या भागात साफसफाई व फवारणी करण्यासंदर्भात सूचनाही केल्या. शहर व परिसरात डेंगी, मलेरिया, चिकनगुनियाची साथ सुरू आहे. या आजाराला शहरातील अस्वच्छता कारणीभूत ठरत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून स्वच्छता व साफसफाईची कामे वेळेवर केली जात नाहीत, अशी नाराजी डॉ. पवन लड्डा यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अशा तक्रारीनंतर साफसफाईसंदर्भात नगरसेविका योजना कामेगावकर, स्वच्छता निरीक्षक माधव फिस्के, विश्वजित पाडुळे हे स्वच्छतेसाठी धावून आल्याचे अनुभवही नागरिकांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206539519031296001?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206539148149936133?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!