🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद महापालिकेचा कारभार महापालिका आयुक्तांशिवाय सुरू होता. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांपासून आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देखील पुर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी केली होती. बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या संदर्भातील आदेश बुधवारी जारी केले.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक हे दिवाळीसाठी प्रदीर्घ रजेवर गेले होते. रजा संपल्यानंतरही ते रूजू झाले नाही, व त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतल्यामुळे ते पुन्हा औरंगाबादला येतील की नाही? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून औरंगाबाद महापालिकेचा कारभार ठप्प झाला होता.
पुर्णवेळ महापालिका आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न झाले. आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवदेनाद्वारे तर प्रदीप जैस्वाल यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महापालिकेला आयुक्त मिळावा म्हणून मागणी केली होती. आयुक्त नसल्यामुळे शहरातील पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते, वीज आदी महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते.
अखेर आज शासनाकडून बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची औरंगाबाद येथे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. निपुन विनायक (भाप्रसे) यांच्या जागी हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अपग्रेड करण्यात आल्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पांडे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असेही स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1202471029756461056?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1202464616489639936?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
