Share

महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री गटाची स्थापना करत शेतकरी आंदोलकांशी चर्चा आज केली. दरम्यान चर्चेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी हे तांत्रिकदृष्ट्या शेतकरी नसल्याचं म्हटलं होत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्या जात आहे.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवदेन देतांना म्हणाले, महामोर्चा घेऊन आलेल्यांपैकी ९० ते ९५ टक्के हे तांत्रिकरित्या शेतकरी नाहीयेत. त्यातले बहुतांश गरीब आदिवासी असून ते त्यांच्या वेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सुरुवातीपासूनच सरकार मोर्चेकऱ्यांच्या संपर्कात होते. मात्र ते मोर्चावर ठाम होते. शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत सरकार संवदेनशील आहे. त्यामुळे मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!