Share

राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून 90 लाखांचे फंडिंग, भाजपच्या प्रश्नांनी कॉंग्रेस घायाळ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. व्हॅलीत निर्माण झालेल्या तणावादरम्यान राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारला चीनवरूनही प्रश्न विचारण्यात आले होते. काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेनंतर भाजपने आता तोफ तोफ डागली आहे.

भाजपाने पोसलेलं गिधाड आमदार झाल्यामूळे ‘हर्षवायु’ झालाय, राष्ट्रवादीची रणरागिणी कडाडली

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक सहाय्य केल्याचा दावा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. रविशंकर यांनी सांगितलं, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने पैसे दिले आहेत. त्यामुळे चीनसोबत हे प्रेम कसं वाढलं हे कॉँग्रेसने सांगावं.

प्रसाद म्हणाले, काँग्रेसच्या काळातच चीनने आपल्या जागा हस्तगत केल्या. कायद्यानुसार, सरकारची परवानगी घेतल्याशिवाय विदेशातून पैसे घेणं गुन्हा आहे. त्यामुळे हे डोनेशन घेताना सरकारची त्यांनी परवानगी घेतली होती का हे काँग्रेसने स्पष्ट करावं असं रविशंकर यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मिळालेल्या डोनेशनचं कारण विचारत जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

मोठी बातमी : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

“२००५-०६मधील राजीव गांधी फाउंडेशनला डोनेशन देणाऱ्यांची यादी आहे. यात चीनच्या दूतावासानेही डोनेशन दिलं आहे. हे स्पष्टपणे दिलं आहे. हे असं का झालं. याची काय गरज पडली? काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं की चीनसोबत इतकं प्रेम का आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला इतका पैसा कोणत्या गोष्टीसाठी देण्यात आला आणि त्यांनी देशात कोणता अभ्यास केला असा सवाल नड्डा यांनी काँग्रेसला केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!