मध्य प्रदेश : मध्य प्रदेशाच्या एका जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारने काही भागात लॉकडाऊन शिथिल करत दुकानं उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यामध्ये मॉल्स, सलून, दारू विक्री यावर बंदी कायम होती. मात्र या नियमांचं उल्लंघन करत काही ठिकाणी सलून उघडण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढलेली केस कापण्यासाठी नागरिकांनी सलून मध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी केली. मात्र या गर्दीलाचं कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.
ही घटना मध्यप्रदेशमधील खरगौन जिल्हयातील आहे. ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच खूप मोठा गोंधळ उडाला असून तात्काळ हे सलून बंद करण्यात आलं. सलूनमधून या ९ लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही ६० वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २ महिन्यात एकूण २० नवे रूग्ण आढळले आहेत.
तसेच जिल्ह्यातील ६ लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच सकाळी आणखी तिघांची रिपोर्ट निगेटिव्ह आली असून यामध्ये ३ वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. खरगौनच्या सीएमएचओ डॉ दिव्येश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्ती बडगावमध्ये आली होती.
नाही तर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान | Shree Shivpratishthan |
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

