मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. डनी निकामी झाल्याने आदित्य पौडवालचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे . महिन्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या निधानातून बॉलिवूड आणि चाहते सावरले नसताना आणखी एक धक्का बसला आहे
‘अरुण पौडवाल आणि अनुराधा पौडवाल खूप गप्पिष्ट. पूर्वी खारच्या त्यांच्या घरी जाणे झाले की हा छोटासा आदित्य छान हसून स्वागत करणार. त्यानेही संगीत वारसा जपला…. आज वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याच्या जाण्याचे वृत्त प्रचंड धक्कादायक. दुर्दैव’ अशी प्रतिक्रिया प्रख्यात सिने अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी आठवणी जागवल्या आहेत.
म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम केले होते.गेल्या काही दिवसांपासून आदित्य मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे.
महत्वाच्या बातम्या
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्या – मुख्यमंत्री
‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार ; शिक्षणमंत्र्यांची माहिती
कोरोनामुळे अहमदनगरमधील पुरोहितांकडून पंधरा दिवस दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय!


