मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.
यासर्व घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगना रणौतच्या घरी जाऊन भेट घेतली. यानंतर, “मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. रिपाई कंगनासोबत असून जाणूनबुजून त्रास देण्याचं काम सुरु आहे. तर बदल्याच्या भावनेतून कारवाई असल्याचं, आठवले म्हणाले. या मुद्द्याशिवाय इतर अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं आठवलेंनी सांगितलं. तसंच, कंगना आरपीआयमध्ये आल्यास १०० टक्के स्वागत करेन, तर भाजपमध्ये आल्यास ५० टक्के स्वागत करेन,” असंही ते म्हणाले होते.
दरम्यान, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कंगना समर्थकांवर चांगलाच झळफळाट काढला आहे. भाजपसह रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर तिखत निशाणा साधला असून कंगनाला दुश्मन असे देखील संबोधले आहे. बाळासाहेबांचा निखारा अजूनही धगधगता असून शंका असल्यास फुंकर मारून पाहावी असे आव्हान देखील दिले आहे.
सामनाने रामदास आठवलेंवर डागली तोफ :
डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान! डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्टय़ा मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.
महत्वाच्या बातम्या:-
- प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन
- मुंबईचे वस्त्रहरण! सामना अग्रलेखातून टिकाकारांवर झळफळाट
- घाबरून न जाता सावधानता बाळगत कोरोनाला हरवूया ; राज्यपालांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

