Share

जगातील टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी ७ शहर भारतातील ; गुरूग्राम पहिल्या स्थानावर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जगातील टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी तब्बल ७ शहर हि भारतातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ मधील सर्वाधिक प्रदूषित  गुरूग्राम, गाझियाबाद, फैजलाबाद, फरीदाबाद, भिवंडी, नोएडा, पटना, होतान, लखनौ आणि लाहोर अशी जगातील टॉप टेन प्रदूषित शहरांची नावे आहेत.

पर्यावरण स्वच्छता आणि संतुलन यासाठी काम करणारी सामाजिक संस्था ग्रीनपीस यांनी सर्वेक्षण करून २०१८ मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी केली आहे. या यादीमध्ये टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी ७ शहर भारतातील असल्याचे समोर आले आहे. ग्रीनपीसने दिलेल्या अहवालानुसार नवी दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राज्य आहे. येथील एअर क्वालिटी इंडेक्स हे सर्वाधिक असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भारतातील एक ना दोन तर तब्बल ७ शहरांचा यामध्ये समावेश असल्याने देशासाठी हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या शहरातील नागरिकांना अशा वातावरणा मध्ये जगणे देखील आता कठीण होऊन बसले आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!