मुंबई : भारतात आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर अनेक संघ तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमिवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आगामी काळात वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील ७ दिग्गज खेळाडूंनी आगामी वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणाऱ्या संघात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचा दौरा हा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून बघीतला जात होता. मात्र प्रमुख खेळाडुंनी माघार घेतल्याने टी-२० विश्वचषकाच्या तयारीला खिळ बसला आहे. पॅट कमिन्स, ग्लॅन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, स्टोइनिस, जॉय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन या खेळाडूंनी आगामी दौऱ्यातुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षभरापासुन सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे खेळाडुंना सतत बायोबबलमध्ये राहावे लागत आहे. तर दुसरीकडे आगामी काळात युएई येथे आयोजीत आयपीएल स्पर्धाही यामागे कारण असल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचे आदेश खेळाडूंना दिले आहे. तर आयपीएलने उर्वरीत हंगामात सहभाग नाही नोदंवला तर खेळाडुंच्या मानधनात कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे द्विधा मनस्थितीत असलेल्या खेळाडूंनी क्रिकेटपासुन दुर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
- उदयनराजेंचा सरकारला अल्टीमेटम, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली तीव्र नाराजी व्यक्त

