Share

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.

दरम्यान, पुणे विभागात उमेदवारांची संख्या जास्त होती. परंतु महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. या उमेदवारांसाठी दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लागली. गेले काही दिवस शिक्षक, पदवीधरांचे मेळावे, भेटीगाठी या माध्यमातून वातावरण ढवळून निघाले होते. दोन्ही मतदारसंघांत अन्य पक्ष व काही अपक्ष उमेदवारांनी जोर लावून रणधुमाळीत रंगत आणल्याचे चित्र होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!