यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव पासून जवळच असलेल्या गुजरी येथील शिवारात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज, सकाळी उघडकीस आली.
गुजरी शिवारातील अरुण गोंडे यांचे शेतात निमगव्हान येथील गायी चारणारे काही दिवसांपासून गायी चाराईसाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामी होते. काल, संध्याकाळी राळेगाव तसेच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री वीज पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंबातील सगळेच सदस्य या घटनेत मृत्यमुखी पडले. मृतकामध्ये चार माणसे व दोन महिलांचा समावेश आहे.
अभिमानअंबाडरे(50), लक्ष्मण कोयरे(50), सुभाष नेहारे (35), साहेबराव देवनरे(35), पिसाबाई देवनरे (30), मंदाबाई अंबाडरे (35) चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.हे सर्व निमगव्हाण येथील आहे. या घटनेची माहिती पडताच घटनास्थळी राळेगाव तहसीलदार, ठाणेदार तलाठी हजर झाले आहे.या कुटंबकडे गायी असून एकही गाय मृत्यमुखी यात पडली
हेही पहा –


