तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे वाढदिवसानिमित्ताने पार्टीतील मांसाहारी भोजणाचा आस्वाद घेताना पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून पाच जण मात्र पळुन जाण्यात यशस्वी झाले आहेत. यावेळी घटना स्थळावरुन कार , मोटार सायकल सह पार्टीचे साहित्य असे एकुण १०,४५,३००रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई मंगळवार दि.२१ रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की नळदुर्ग परिसरात इंद्रजित उर्फ मिटु रणजितसिंग ठाकुर याने आपल्या वाढदिवसानिमित्त मांसाहारी पार्टीचे आयोजन केले होते.या पार्टीला त्याने मिञांना बोलवले. माञ पोलिसांना याची माहीती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मांसाहारी पार्टीचा आस्वाद घेताना इंद्रजित उर्फ मिटु मिटु रणजितसिंह ठाकुर ,विश्वजित रणजितसिंह ठाकुर ,सौरभ दत्तुसिंग गहेरवार ,सुदर्शन योगेश जाधव ,महेश दिनेशसिंग हजारे, अहमद गौस युनुस कुरेशी सर्व रा. नळदुर्ग हे तोंडाला मास्क न बांधता जेवत असताना त्यांना अटक केली.
सध्या जगात व देशात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना ऐकञित वाढदिवसाची पार्टी करताना आढळून आल्याच्या कारणावरुन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली. सदर ठिकाणावरुन माञ रोहीत राठोड, संग्राम ठाकुर ,दादा शिंदे ,बालाजी कांबळे, सुरज मस्के पळुन गेले. माञ वरील लोकांना घेऊन आलेली कार, मोटार सायकल आणि पार्टीचे साहित्य असा एकुण १०,४५,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

