टीम महाराष्ट्र देशा : उंदीर कांद्याचा तीक्ष्ण वास सहन करू शकत नाही. उंदीर फिरत असेल त्या ठिकाणी कांद्याचे लहान-लहान तुकडे ठेवावे. या वासामुळे उंदीर पळ काढेल. तसेच केसांचा गुंता उंदराच्या बिळाजवळ ठेवावा. उंदीर हे खाऊन मृत्यू पावतात.
याच प्रमाणे उंदराच्या बिळाजवळ शेण ठेवावे. शेण खाऊन उंदीर मरून जाईल. उंदीर तमालपत्राच्या गोड वासाने खेचले जातात, परिणामस्वरूप ते तमालपत्र खातात आणि उंदरांसाठी यात असलेले विषारी तत्त्वामुळे मरतात. उंदराच्या बिळाजवळ तुरटी पावडर ठेवावी. उंदीर पळ काढतील.
तसेच जेथून उंदीर घरामध्ये येतात जातात त्यांचा या मार्गात लाल मिरची पावडर टाकावी. असे केल्यामुळे उंदीर घरात पुन्हा येताना दिसणार नाहीत. फिनाइलच्या गोळ्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे उंदरांचा त्रास कमी होतो. यामुळे उंदीर घरात येणार नाहीत.
दरम्यान, पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील. पुदिन्या प्रमाणेच तेज पत्ता पण उंदीर घराबाहेर काढण्यास मदत करते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

