टीम महाराष्ट्र देशा : ३० रुपयांमध्ये डझनभर मिळणाऱ्या केळांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये वेगळीच किंमत पाहायला मिळाली. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये २ केळांचे तब्बल 442 रुपय बिल देण्यात आलं आहे. अभिनेता राहुल बोस सोबत चंदिगडमधील jwmarriot या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.
अभिनेता राहुल बोस हा एका चित्रपटाच्या शूटींग साठी चंदिगडमध्ये आहे. राहुल बोस हा चंदिगडमधील jwmarriot या पंचतारांकित हॉटेलमध्ये निवसासाठी आहे. दरम्यान राहुल बोस हा जिममधून आल्यानंतर हॉटेलमध्ये खायला म्हणून दोन केळी मागवली. त्यावेळी हॉटेलमधून त्यांना दोन केळी आणि बिलही पाठवण्यात आले. दोन केळांचे बिल पाहून राहुल बोसला धक्काच बसला. हॉटेलने दोन केळांचे तब्बल 442 रुपये बिल राहुलला पाठवले होते. हॉटेलने केळाच्या मूळ बिलाच्या रकमेत जीएसटीही जोडले होते.
विशेष म्हणजे दोन केळांचे ते बील पाहून राहुलने लगेचच एक व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला. राहुलने 22 जुलै रोजी हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. राहुल बोसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झालेला सगळा प्रकार सांगितला. तो शुटींगसाठी चंदीगढ येथील JWmarriot या हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने त्याची लॅविश रुम दाखलवली. याशिवाय त्याने मागवलेली केळी आणि त्याचे बीलही दाखवले आहे. केळ्यांच्या किंमतीवरुन त्याने या हॉटेललाही फटकारले. ही एक प्रकारे लूट असल्याचेही त्याने म्हटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

