औरंंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाच्या आदेशाने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतांना देखील रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांवर पोलिसांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणा-या १९१ जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहर वाहतूक शाखाा पोलिसांनी १ हजार १७३ जणांवर कारवाई करीत ४ लाख ३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी मंगळवारी (दि.११) दिली आहे.
कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर राज्यशासनाच्या आदेशाने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून संचारबंदी लागु करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहराच्या विविध भागात पोलिसांचे ५४ फिक्स पॉईन्ट लावण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणा-या १९१ जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच शहर वाहतूक शाखा पोलिसांनी विविध भागात अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणा-या १ हजार १७३ जणांवर कारवाई करीत जवळपास ४ लाख ३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, तोंडाला मास्क न लावता फिरणा-याविरूध्द देखील पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी विविध भागात विनामास्क फिरणा-या ११६ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ५८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

