मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता काही भागातील उद्योग व कारखाने सुरु करण्यास राज्य सरकारने परवागी दिली आहे. 65 हजार उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली असून त्यापैकी 35 हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे 9 लाख कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
ते म्हणाले की, विदेश गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. अमेरिका, जपान, तैवान, जर्मनी, जपान, इंग्लड आदी देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकारी वाटाघाटी करत आहेत.
तसेच एमआयडीसीने विदेश गुंतवणुकदारांसाठी राज्याच्या विविध भागात सुमारे 40 हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे उद्योग झटपट सुरू होतील. एकदा उद्योग सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत उर्वरित परवाने घ्यावेत, असंही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यात कोरोनामुळे गेले दीड महिना लॉकडाऊन होता. त्यामुळे अनेक उद्योग हे ठप्प झाले. परिणामी या छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे मजूर आता आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे काही भागात उद्योग सुरु झाले असले तरी कामगार मात्र काम करण्यास उपलब्ध नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
या काळात मुंबईचे महत्व टिकवणे गरजेचे, मुंबईसाठी वेगळे पॅकेज हवे : संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
