पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हि आटोक्याबाहेर असून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यातच, लग्न-समारंभांवर ५० वऱ्हाड्याना परवानगी असली तरी हे समारंभच आता धोकादायक बनत आहेत. त्यामुळे आता पुण्याच्या जुन्नर तालुक्यात २० वऱ्हाड्यानाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यासह 35 हून अधिक वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे वर-वधूच्या गावांसह सात गावं सील करण्यात आलीत. परिणामी हजारो ग्रामस्थ कोरोनाच्या धास्तीत आहेत.
जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील मुलाचे धालेवाडीतील मुलीशी नुकताच विवाह झालाय. वर-वधू एकाच तालुक्यातील असल्याने या विवाहात 50 वऱ्हाड्यांची परवानगी धुडकवली गेली. आसपासच्या गावातील पै-पाहुणे आणि मित्र मंडळीच्या मोठ्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. नियमांचा भंग इथंच थांबला नाही तर हिवरे बुद्रुकमध्ये रात्री डीजेच्या तालावर वरातही निघाली.
हिवरे बुद्रुक हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचे, पण बेनकेंच्या कानापर्यंत डीजेचा दणदणाट पोहचलाच नाही. माझं गाव असलं तरी सध्या मी नारायणगावमध्ये वास्तव्यास असल्यानं गावात नेमकं काय घडलं हे मला माहित नव्हतं, असं आमदार बेनकेंचं यावर म्हणणं आहे. तोपर्यंत दणक्यात वरात पार ही पडली होती. ही माहिती ABP माझाच्या बातमीनुसार समजत आहे.
दुर्बल घटकांचा विचार करून लॉकडाऊन करा;महापौरांचे आवाहन
कोरोनाच्या काळात थाटामाटात लग्न करण्याची हौस सात गावातील हजारो ग्रामस्थांना संकटात टाकणारी ठरलीये. तरी प्रशासनाने केवळ डीजे ताब्यात घेत डीजे चालकावर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. विवाह सोहळा आयोजक आणि मंगल कार्यालय मालकावर गुन्हा का दाखल केलेला नाही? या प्रश्नावर प्रशासन अनुत्तरित आहे. कोरोनाच्या सावटाखाली लग्नसराई पार पडतीये. अशात वऱ्हाड्यांकडून उतावळेपणा झालेला दिसतोय.
छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वऱ्हाडी मंडळी कोरोनाच्या महाभयंकर संकटाला आमंत्रित करतायेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात 50 ऐवजी केवळ 20 वऱ्हाड्यांनाच विवाह सोहळ्यांसाठी आता परवानगी दिली जातीये. एकतर कमी संख्येत अथवा कोरोनाच्या महामारीनंतर विवाह सोहळे घ्यावेत, असं आवाहन ही पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय.
घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? कपिल सिब्बलांचा घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

