सोलापूर : भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकानेच शासनाला बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवून चक्क 32 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केलीय. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची – उद्धव ठाकरे
आमसिद्ध भिकप्पा बिराजदार असे या शिक्षकाचे नाव आहे. 1984 मध्ये बिराजदार यांनी मुंबईच्या सोमय्या अध्यापक महाविद्यालयातून बोगस पदवी मिळवली. त्या आधारे 1988 साली ते सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कामाला लागले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. बनावट गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी तब्बल 32 वर्षे शासनाची फसवणूक केली.
हे उघडकीस आल्यानंतर शिक्षण खाते खडबडून जागे झाले. आमसिद्ध बिराजदार यांच्या विरोधात शिक्षण संचालकांकडे सुनावणी झाली. यामध्ये बिराजदार हे दोषी आढळून आले. त्यांनतर त्यांना सेवेतून निलंबित करून वळसंग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिराजदार यांनी शासनाकडून जेवढा पगार घेतला, सुविधा घेतल्या त्यांची संपूर्ण वसुली करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आमसिद्ध बिराजदार यांनी मुंबईच्या अध्यापक महाविद्यालयातून पदवी घेतल्याचे दाखवले. त्यांच्या प्रमाणपत्रकावर 2042 आणि गुणपत्रकावर 2043 क्रमांक आहे. वास्तविक 2 हा क्रमांक उर्दू माध्यमाची आहे तर मराठीसाठी 1 कोडने बैठक क्रमांक सुरु होतो. 1984 साली बिराजदार यांनी पदवी घेतली. त्यांच्या प्रमाणपत्रावर प्राचार्य म्हणून पाटील यांची सही आहे. त्यावेळी कांताबेन आशर या प्राचार्य होत्या. पाटील नावाचे कोणीही प्राचार्य नव्हते. बिराजदार यांनी नकली डिग्री तयार केल्याचे उघड होते.
धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २४ करोना रुग्णांची भर
दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार बिराजदार यांच्याविरोधात बनावट शिक्षण शास्त्र डीएड पदवी प्रमाणपत्रद्वारे शिक्षकाची नोकरी मिळवली व शासनाची फसवणूक केली याबद्दल वळसंग पोलिस ठाण्यात सोलापूर दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. जानेवारीमध्ये तक्रार आल्यानंतर बिराजदार यांनी घेतलेल्या पदवी प्रमाणपत्राची तपासणी झाली. त्यात त्यांची पदवी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आहेरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक होते. बिराजदार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झालेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
