Share

Thackeray vs Shinde | ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील ; शिंदे गटातील खासदाराचा दावा

Published On: 

🕒 1 min read

Thackeray vs Shinde | बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

यापूर्वी देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल, असा दावा खासदार जाधव यांनी केला.

यापूर्वी खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे घरातच फूट पडल्याचे चित्र आहे.  याबाबत, गजानन कीर्तिकर यांची घरी समजूत काढली होती का?, असा सवाल अमोल कीर्तीकर यांना करण्यात आला होता. याबाबत त्यांनी उत्तर दिलं होत.

गजानन कीर्तिकर हे माझे वडील आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबतच राहणार आहे, असं अमोल कीर्तीकर म्हणाले होते. तसेच पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काम करणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये शिवसैनिकांचं प्रेम मिळत आहे. फोन करून लोकं सोबत असल्याचे सांगत आहे. त्यांच्या विश्वासाला तडा देणार नाही, असं देखील ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!