Share

‘तुळजापूरात’ कोरोनाची साखळी तोडण्यासाठीचा जनता कर्फ्यु महिला पोलिसांनी रस्त्यावर उतरुण केला यशस्वी

Published On: 

तुळजापूर – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयात दुसऱ्यांदा पुकारलेल्या कर्फ्यु तुळजापूरात महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन यशस्वी केला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी दिवसभर उन्हातान्हाची पर्वा न रस्त्यावर फिरल्या. महिला पोलिस रस्त्यावर बंदोबस्तासाठी असल्याने टवाळखोर मंडळी दिवसभर घरातच बसुन राहिले. सुचना न पाळणाऱ्या काही जणांना महिला पोलिसांनी काठीचाही प्रसाद दिला.

प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवुनही नागरिकांकडून यास अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत.  नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी मंगळवार दि ३१ रोजी जनता कर्फ्यु पुकारला. यात पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी महिला पोलिस काठ्या हातात घेवुन रस्त्यावर उतरल्या. या महिला पोलिसांनी शहरात   रस्त्यावर फिरणा-या तरुणांना घरात पिटळुन लावले.

जे ऐकत नव्हते त्यांना पोलिसी खाक्या दाखवून दिवसभर उगाच फिरणा-या तरुणांना घरात बसविले. त्यामुळे दिवसभर या महिला पोलिस रणरागिणींनी स्वताचा जीवावर पोलिस सहकार्यांची मदत करुन देशावर संकट आल्यावर आम्ही आमचा पोलिस बांधवा सोबत देशाची देशाला नागरिकांना मदत करण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवुन दिले. जनता कर्फ्यु काळात फक्त रुग्णालये, औषधी दुकाने उघडे होते. दुध विक्रेते सकाळी रस्त्यावर होते माञ दुपार नंतर शहरात सर्वञ शुकशुकाट दिसुन आला.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!